Wednesday 28 August 2019

29 ऑगस्ट “राष्ट्रीय क्रीडा दिन”


      महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो. जोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविले जाणार नाही. तेथील युवक युवतींमध्ये क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही. तोपर्यंत ख-या अर्थाने क्रीडा व खेळांची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी दिनांक 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल खोपोली व न्यू इंग्लिश स्कुल मोहोपाडा या शाळांमध्ये 1.  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चर्चासत्रे/परिसंवाद साधणे. 2. उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करणे. 3. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित करणे. 4. क्रीडा वातरवरण निर्मीतीसाठी अनुषंगिक विविध उपक्रम राबविणे. या चार विषयांवर कार्यक्रम करण्यात येत असून इतरही सर्व शाळांमध्ये  जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यास सांगितले आहे.

जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम 2019



युवा जागर- “महाराष्ट्रावर बोलू काही “ या टॅगलाईनच्या आधारे केंद्रशासन व राज्यशासनाच्या वतिने राबविण्यात येणा-या जिल्हास्तरीय छात्र युवा कार्यक्रमात 30 युवक/युवतींनी एकदिवसिय अभिरूप संसदेचे कामकाज अनुभवले. जिल्हा क्रीडा अधिकारी काया्रलयाच्या वतिने पी. एन. पी कॉलेज वेश्वी, अलिबाग येथे हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्ह्यातील 197 कनिष्ठ महाविद्यालयातील युवक/युवतींनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 20 कनिष्ठ महाविद्यालयांचा गट तयार करून गटस्तर स्पर्धा घेण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये 10 गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या गट स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाचे युवक/युवती जिल्हास्तर युवा संसदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले. या संसदेत सहभागी युवकांनी एकदिवसिय अभिरूप संसदेचे कामकाज केले. या संसदेचे उद्घाटन प्राचार्य श्रीमती संजिवनी नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यामध्ये सहभागी युवकांनी विविध खात्याचे मंत्री, विरोधी पक्ष नेता, अध्यक्ष, सचिव इत्यादी पदाचे कामकाज केले. संसदेच्या सुरूवातीस सर्व सदस्यांना गोपनियतेची शपथ देऊन कामकाजास सुरूवात करण्यात आली. या संसदेमधून प्रथम क्रमांक- जहिर कुरेशी - अलिबाग, द्वितीय क्रमांक- कृष्णाली कृष्णाकांत जोशी- पनवेल,  तृतिय क्रमांक- रमेश सुनिल कचरे- महाड यांनी प्राप्त केला. विजेत्यांना रूपये 10,000/-, 7,000/-, 5,000/- याप्रमाणे बक्षिस वितरण करण्यात आले, जिल्हास्तरीय स्पर्धेचे परिक्षण श्रीमती जिविता पाटील,   श्री. निशिकांत कोळसे व श्री. संदीप घाडगे यांनी केले. गटस्तरावर झालेल्या विजेत्यांना रूपये 3,000/-, 2,000/-, 1,000/- याप्रमाणे रोख बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण उपशिक्षणाधिकारी श्री. सुनिल गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी- श्रीमती अंकिता मयेकर व गटशिक्षण अधिकारी- श्रीमती थोरात मॅडम यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.

Friday 23 August 2019

जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा दि.30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी

     जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन दि30 व 31 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा  क्रीडा संकुल, अलिबाग येथे करण्यात येणार आहे. याची सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व खेळाडू यांनी नोंद घ्यावी. या स्पर्धांचा सविस्तर कार्यक्रम कार्यायाच्या www.raigadsports.blogspot.com या ब्लॉगवर क्रीडा स्पर्धा कार्यक्रम या टॅबवर पाहता येईल.

Thursday 22 August 2019

जिल्हास्तरीय शालेय खो - खो स्पर्धांचे आयोजन संत नामदेव विद्यालय, नांदगाव ता.सुधागड येथे

*महत्वाची सुचना खेळ -  खो-खो*
काही प्रशासकीय कारणास्तव  *दि.26 व 27 ऑगस्ट 2019 रोजी होणा-या जिल्हास्तरीय शालेय खो - खो स्पर्धांचे आयोजन संत नामदेव विद्यालय, नांदगाव ता.सुधागड येथे करण्यात येत आहे.* याची कृपया सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.

Tuesday 20 August 2019

रायगड जिल्हा क्रीडा परीषद आयोजित तळा तालुका स्पर्धा

रायगड जिल्हा क्रीडा परीषद आयोजित तळा तालुका पातळीवर अशोक ल.लोखंडे विध्यामंदिर पिटसई विद्यार्थ्यांनी 14 वर्षे मुले खो-खो प्रथम क्रमांक 14 वर्ष मुले कबड्डी द्वितीय क्रमांक व 17 वर्ष मुली कबड्डी प्रथम क्रमांक मीळवुन घवघवित यश संपादन केले त्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी गोळे साहेब,संजय रेडीज साहेब मुख्याध्यापक संतोष रेडीज सर क्रीडा शिक्षक अरुण खुळपे सर कातुर्डेसर ,ठमकेसर ,सौ.रेखा रेडीज ,सर्जेसर व सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले

मुरूड तालूका खो खो स्पर्धा निकाल

मुरूड तालूका खो खो स्पर्धा निकाल
14 वर्ष वयोगट
मुले
1) सर एस ए ......मुरुड
2)मेहबूब स्कूल  ......विहूर
मुली
1)सर एस ए .......मुरुड
2)मेहबूब स्कूल .....विहूर
17वर्ष वयोगट
मुले
1)सर एस ए ....मुरूड
2)मेहबूब स्कूल..... विहूर
मुली
1)सर एस ए .....मुरूड
2)मेहबूब स्कूल.... विहूर
19वर्ष वयोगट
मुले
1)सर एस ए ....मुरूड
2)मेहबूब स्कूल ....विहूर
मुली
1)मेहबूब स्कूल ...विहूर
2)सर एस ए...  मुरुड
स्पर्धेतील सर्व संघांचे अभिनंदन
💐💐💐💐💐💐💐💐

कर्जत तालुकास्तर क्रीडास्पर्धा अंतर्गत कबड्डी (मुले) 14,17 व 19 वर्षाखालील स्पर्धा

आज दिनांक 20/08/2019 रोजी रायगड जिल्हा क्रीडा परिषद आयोजित कर्जत तालुकास्तर क्रीडास्पर्धा अंतर्गत कबड्डी (मुले) 14,17 व 19 वर्षाखालील स्पर्धा धामोते  विद्याभवन  ,नेरळ येथे अतिशय उत्साहात संपन्न झाल्या.....
          स्पर्धेमध्ये 14 वर्षाच्या 33 संघांनी,17 वयोगटातील संघांनी 25 संघांनी आणि 19 वर्षाखालील 7 संघांनी सहभाग घेतला होता.....
धामोते शाळेच्या *मुख्याध्यापिका सौ. जोगळेकर मॅडम* ,
तालुकाक्रीडासमन्वयक
श्री.किशोर म.पाटील
*आणि श्री.समीर ता.येरुनकर* यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली...
     स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे नोंदवला गेला *1)14 वर्षे वयोगट--विजेता-भा.रा.विद्यालय कशेले,*
          उपविजेता-गौळवाडी माध्यमिक विद्यालय गौळवाडी
        *2)17 वर्षे वयोगट--विजेता-अभिनव प्रशाला कर्जत*
      उपविजेता-L.E.S.इंग्लीश स्कुल नेरळ
        *3)19 वर्षे वयोगट--विजेता-श्रमजीवी विद्यालय पोशीर*
       उपविजेता-अभिनव प्रशाला कर्जत.
सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन....
      स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षकांचे उत्तम सहकार्य लाभले श्री.यशवंत वाघरे,श्री.चौथे सर,श्री.बिरारी सर आणि श्री.गावडे सर यांनी तक्रार निवारण समिती ची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली....स्पर्धेसाठी *जिल्हा क्रीडाधिकारी सौ.मयेकर मॅडम ,*
जिल्हा क्रीडा कार्यालयाचे श्री.निकम साहेब
रायगड जिल्हा परिषद *शिक्षणाधिकारी(प्राथमिक व माध्यमिक)*
गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी
पं. स. कर्जत...यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले....
     *सर्वांचे हार्दिक आभार*

तळा तालुका पातळीवरिल खो-खो क्रिडा स्पर्धा

रायगड जिल्हा क्रीडा परिषदेने आयोजित केलेल्या तालुका पातळीवरिल खो-खो क्रिडा स्पर्धेत bandarkatha madhyamik vidyalay majgaon tamanne च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले   14वर्षाखालील मुली-प्रथम क्रमांक 14वर्षाखालील मुले-द्वितिय क्रमाक 17वर्षाखालील मुली-प्रथम क्रमांक 17वर्षाखालील मुले प्रथम क्रमाक या क्रीडा स्पर्धा दिनाक 19-8-2019व 20-82019रोजी तळा येथील बोरघर क्रिडा संकुलात आयोजित केल्या होत्या वरील सर्व खो-खो संघाना श्री शिवरकर.S.D.सरानी मार्गदर्शन केले व इतर शाळेतील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले

Monday 19 August 2019

दि.21 व 22 ऑगस्ट 2019 रोजी होणा-या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा पुढे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

         काही प्रशासकीय कारणास्तव  दि.21 व 22 ऑगस्ट 2019 रोजी होणा-या जिल्हास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा पुढे घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
        सुधारीत स्पर्धा आयोजन कार्यक्रम लवकरच सर्वांना कळविण्यात येईल. याची कृपया सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, खेळाडू यांनी नोंद घ्यावी.

Saturday 17 August 2019

*महत्वाची सूचना* Primary form main आणि additional दोन्ही सुरू आहे

*महत्वाची सूचना*
Primary form *main* आणि *additional* दोन्ही सुरू आहे. दिनांक २० अगस्त पर्यंत भरता येईल. ज्यांनी *main* form भरलेला नाही त्यांनी main form भरावा व ज्यांनी main भरला आहे परंतु काही खेळ राहिले आहेत त्यांनी additional  form भरावा. दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून कार्यवाही करावी.

जिल्हास्तरीय शालेय जलतरण क्रीडा आयोजन कार्यक्रम बदलाबाबत.



              विषय- जिल्हास्तरीय शालेय क्रीडा आयोजन कार्यक्रम बदलाबाबत.
              खेळ -  जलतरण


स्पर्धा परिपत्रक -
       जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयेाजित करण्यात येणा-या  जिल्हास्तरीय स्पर्धांच्या आयेाजन कार्यक्रमामध्ये काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव बदल करण्यात येत आहे.
//सुधारीत आयोजन कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.//
अ.क्र.
खेळ
वयोगट
स्पर्धा उपस्थिती ‍ / वजने
स्पर्धा दिनांक
ठिकाण
1
जलतरण
14,17,19 वर्षाखालील मुले व मुली
दि.30 /08/2019
स.09.00 वा
दि.30 /08/2019
कर्नाळा र्स्पोर्टस ॲकेडेमी, पनवेल
                                                                                                        

आता मिळवा क्रीडा विभागाची सर्व माहिती आपल्या मोबाईलवर तर त्वरा करा आणि लगेच भेट द्या https://raigadsports.blogspot.com/


 रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा संघटना, पालक, क्रीडाप्रेमी नागरिक तसेच रायगड जिल्ह्यातील नव्हे राज्यातील, राज्याबाहेरील सर्वांनाच क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धा आयोजन कार्यक्रम, विविध उपक्रमांची माहिती, युवक कल्याण विषय कार्यक्रम, शासनाच्या क्रीडा विषयक कार्यरत योजना व उपक्रम, भविष्यातील शासनाचे क्रीडा क्षेत्रासंबंधीची ध्येय धोरणे, नियोजन इत्यादींची माहिती व बातम्या केव्हाही,कोठेही, संगणक, भ्रमणध्वनी (मोबाईल), टॅब, लॅपटॉप इत्यादी इलेक्ट्रॉनिक साधनांवर तात्काळ मिळावी या  उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने अधिकृत ब्लॉग (माहितीपर वेबसाईट) तयार करण्यात आली आहे. हा ब्लॉग पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा  https://raigadsports.blogspot.com/

 चला खेळूया , जीवनातील आनंद मिळवू या 

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...