पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Wednesday, 30 August 2023
प्राथमिक प्रवेशिका भरणे बाबत महत्त्वाची सूचना
Thursday, 24 August 2023
जिल्ह्यातील सर्व शाळा/ विद्यालय/ महाविद्यालय/ शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन आयोजन
दि.29 ऑगस्ट हॉकीचे जादुगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असून हा दिवस संपुर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दि.29 ऑगस्ट 2023 रोजी राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळा/
विद्यालय/ महाविद्यालय/ शैक्षणिक संस्थांमध्ये खालील प्रमाणे खेळांच्या स्पर्धांचे
आयेाजन करावे. 1. मैदानी स्पर्धा 2.
फुटबॉल 3.स्वदेशी खेळ 4. आंतरगृह क्रीडा स्पर्धांमध्ये
बॅडमिंटन, कॅरम, बुध्दिबळ इ. 5.बाहुबल स्पर्धा (आर्म रेसलिंग) 6. मनोरंजनाचे खेळ - लंगडी, लिंबु चमचा इ.
या कार्यक्रमाचे उद्घाटनवेळी मेजर
ध्यानचंद व कै. खाशाबा जाधव यांचे प्रतिमांचे पुजन करावे. त्यांचे विषयी
विद्यार्थ्यांना प्रस्तूत माहिती देण्यात यावी. तसेच आयोजनाचे बॅनरवर जी-20 या
लोगो तसेच केंद्र शासनामार्फत क्रीडा दिनाचा
तयार करण्यात आलेला लोगो (ऑनलाईवरुन डाऊनलोड करता येईल) याचा वापर करावा. वर्षभर
विविध स्पर्धांत खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या आपल्या शैक्षणिक संस्थेतील
खेळाडूंना प्रोत्साहन देवून / बक्षिस देवून सत्कार करावा. आयोजित कार्यक्रमांची
नोंद फीट इंडीया - एन एस डी ( https://fitindia.gov.in ) येथे करावी आभासी
समाजमाध्यमे जसे फेसबुक, इन्स्टाग्राम इ. वर कार्यकमांचे छायाचित्रे (फोटो),
चलचित्रे (व्हीडीओ) #National Sports Day
वापरुन अपलोड करावे.
Wednesday, 23 August 2023
महत्वाची सुचना स्पर्धा ऑनलाईन प्रणाली बाबत प्रशिक्षण
Monday, 21 August 2023
प्राथमिक प्रवेशिका बाबत महत्वाची सुचना
शालेय क्रीडा स्पर्धांची प्राथमिक प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी क्रीडा स्पर्धा सहभाग नोंदविणे, शुल्क भरणे, खेळाडूंचे प्रवेश अर्ज सादर करणे इत्यादी प्रक्रीया वेळेत पुर्ण करुन घ्यावी. प्राथमिक प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी सायं.05.00 पर्यंत राहील. प्राथमिक प्रवेशिका भरतांना सर्वांनी माहिती व शुल्क काळजीपुर्वक भरावे. चुका होणार नाहीत याची दक्षता अवश्य घेण्यात यावी. प्रवेशिकेमध्ये माहिती भरल्यानंतर ती पीडीएफ(PDF) स्वरुपात डाऊनलोड करुन घेता येते. तशी पीडीएफ डाऊनलोड करुन तपासून घेता येईल. खात्री झाल्यासच सर्व शुल्क भरण्याची प्रक्रीया करावी.
आपला
रविंद्र नाईक,
जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तथापि, सन 2020-2021 आणि 2021-2022 या दोन वर्ष...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...
-
दिनांक १९-०७-२०२२ *सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल महत्वाची सूचना* फक्त रायगड जिल्हा (पनवेल मनपा वगळून) काही तांत्रिक व अपरिहार्य कारणास्तव रायगड...