शालेय क्रीडा स्पर्धांची प्राथमिक प्रवेशिका उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सदर प्रवेशिका सादर करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आलेली आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी क्रीडा स्पर्धा सहभाग नोंदविणे, शुल्क भरणे, खेळाडूंचे प्रवेश अर्ज सादर करणे इत्यादी प्रक्रीया वेळेत पुर्ण करुन घ्यावी. प्राथमिक प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी सायं.05.00 पर्यंत राहील. प्राथमिक प्रवेशिका भरतांना सर्वांनी माहिती व शुल्क काळजीपुर्वक भरावे. चुका होणार नाहीत याची दक्षता अवश्य घेण्यात यावी. प्रवेशिकेमध्ये माहिती भरल्यानंतर ती पीडीएफ(PDF) स्वरुपात डाऊनलोड करुन घेता येते. तशी पीडीएफ डाऊनलोड करुन तपासून घेता येईल. खात्री झाल्यासच सर्व शुल्क भरण्याची प्रक्रीया करावी.
आपला
रविंद्र नाईक,
जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड
No comments:
Post a Comment