Saturday, 15 July 2023

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा सुधारित कार्यक्रम

 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा परिषद, रायगड अंतर्गत या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांचे आयोजन दि.१८ ते १९ जुलै २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली - संगम, ता. अलिबाग येथे करण्यात येईल. 
*दिनांक १८ जुलै रोजी फक्त १७ वर्ष मुले व मुली* या वयोगटाच्या स्पर्धा होतील. अणि *दिनांक १९ जुलै रोजी १४ मुले* या गटाच्या स्पर्धा होतील.
याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. स्पर्धांसाठीचे ऑफलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दि.17 जुलै 2023 सायं.05.00 पर्यंत राहील. सहभागासाठी प्राथमिक प्रवेश अर्ज गुगल फॉर्मव्दारे जमा करण्यात येतील, त्याची लिंक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या ब्लॉगसाईटवर तसेच जिल्हा क्रीडा विभागाच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप वर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे राहील.  
अ.क्र. वयोगट जन्मतारीख 
1 14 वर्षाखालील मुले ( सबज्युनियर) दि.01 जानेवारी 2010 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा 
2 17 वर्षाखालील मुले / मुली (ज्युनियर) दि.01 जानेवारी 2007 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा 
 या स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व संघांनी सहभागापुर्वीच www.subrotocup.in या संकेतस्थळावर खेळाडू व संघांची नोदणी करणे अनिवार्य आहे. या स्पर्धांसाठी पुढील प्रमाणे कागदपत्रे असणे आवश्यक आहे -  
• संघांचा प्रवेश अर्ज प्राचार्य / मुख्याध्यापक यांचे सही व शिक्यासह 
• खेळाडूचे पात्रता प्रमाणपत्र ( Eligibility Form/ Player ID )
• सर्व खेळाडूंकडे जन्मदाखला, आधारकार्ड (छायाप्रतीसह मुळ प्रतित) असणे अनिवार्य आहे. 
  अधिक माहितीसाठी श्री. सचिन निकम, क्रीडा अधिकारी मो.क्र. 8856093608 , श्रीम. मनिषा मानकर, क्रीडा मार्गदर्शक मो.क्र.9767499162 व फुटबॉल संघटना श्री. किरण आंचन, मो.क्र.9022899933, श्री समीर रेवाळे मो.क्र.9766235250 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...