दि.29 ऑगस्ट हॉकीचे जादुगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असून हा दिवस संपुर्ण भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने दि.29 ऑगस्ट 2023 रोजी राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन व्यापक स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील सर्व शाळा/
विद्यालय/ महाविद्यालय/ शैक्षणिक संस्थांमध्ये खालील प्रमाणे खेळांच्या स्पर्धांचे
आयेाजन करावे. 1. मैदानी स्पर्धा 2.
फुटबॉल 3.स्वदेशी खेळ 4. आंतरगृह क्रीडा स्पर्धांमध्ये
बॅडमिंटन, कॅरम, बुध्दिबळ इ. 5.बाहुबल स्पर्धा (आर्म रेसलिंग) 6. मनोरंजनाचे खेळ - लंगडी, लिंबु चमचा इ.
या कार्यक्रमाचे उद्घाटनवेळी मेजर
ध्यानचंद व कै. खाशाबा जाधव यांचे प्रतिमांचे पुजन करावे. त्यांचे विषयी
विद्यार्थ्यांना प्रस्तूत माहिती देण्यात यावी. तसेच आयोजनाचे बॅनरवर जी-20 या
लोगो तसेच केंद्र शासनामार्फत क्रीडा दिनाचा
तयार करण्यात आलेला लोगो (ऑनलाईवरुन डाऊनलोड करता येईल) याचा वापर करावा. वर्षभर
विविध स्पर्धांत खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या आपल्या शैक्षणिक संस्थेतील
खेळाडूंना प्रोत्साहन देवून / बक्षिस देवून सत्कार करावा. आयोजित कार्यक्रमांची
नोंद फीट इंडीया - एन एस डी ( https://fitindia.gov.in ) येथे करावी आभासी
समाजमाध्यमे जसे फेसबुक, इन्स्टाग्राम इ. वर कार्यकमांचे छायाचित्रे (फोटो),
चलचित्रे (व्हीडीओ) #National Sports Day
वापरुन अपलोड करावे.
No comments:
Post a Comment