क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने
युवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी 15 ते 29 वयोगटातील युवक - युवतींसाठी
30 डिसेंबर 2021 रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या सुचनेप्रमाणे
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व
लोकनृत्य या प्रकांरांचा फक्त समावेश राहील. जिल्ह्यातील
महाविद्यालयांत शिक्षण घेणारे,तसेच शिक्षण पुर्ण झालेले विद्यार्थी, कला अध्यापन, नाट्य
मंडळातील कलाकार इत्यादी सर्वांसाठी या युवा महोत्सवामध्ये विनामूल्य सहभाग घेण्याची
संधी देण्यात येते. या युवामहोत्सवामध्ये विजेता
ठरणा-या संघाला विभागीय स्तरावर सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.
या
युवा महोत्सवाचे आयेाजन पुर्णपणे ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे. युवा महोत्सवामध्ये
सहभागी होण्यासाठी श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र.8856093608 येथे
संपर्क साधावा. प्रवेश अर्जासह नोंदणी केलेल्या संघांना ऑनलाईन बाबत लिंक व इतर माहिती
देण्यात येईल. या युवा महोत्सवामध्ये सहभागी
सर्व स्पर्धकांना सहभाग तसेच विजेत्यांना प्राविण्य प्रमाणपत्र देण्यात येइल. जिल्ह्यातील
जास्तीत जास्त युवकांनी या युवा महोत्सवामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी श्री रविंद्र नाईक यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment