४ थ्या खेलो इंडीया युथ गेम्स हरियाना-2022 करीता महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचेवतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व स्पर्धेचे आयेाजन करण्यात येत आहे.
कबड्डी या खेळाची स्पर्धा दि.24 ते
25 नोव्हेंबर 2021 रोजी कर्नाळा स्पोर्टस ॲकेडेमी, पनवेल येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम व सुचना
देण्यात येत आहेत.
v या स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षाखालील मुले व मुली
असा राहील, तर वजन गट 18 वर्षाखालील मुलांसाठी -70कि आणि 18 वर्षाखालील मुलींसाठी
-65कि असा राहील.
v या स्पर्धेमध्ये रायगड
जिल्ह्यातील शाळा/क्लब यांचे संघ सहभाग घेऊ शकतात.
v संघ नसलेल्या शाळेतील / क्लब
मधील खेळाडू तसेच शाळाबाह्य खेळाडू निवड चाचणी मध्ये सहभाग घेऊ शकतात.
v
सहभागी
होण्यासाठी सर्व संघ / खेळाडूंनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज दि.23/11/2021 रोजी
दुपारी 12.00 वा.पर्यंत मो.क्र.8856093608 या व्हॉट्सॲप वर किंवा ईमेल raigadgames@gmail.com येथे पाठवावे.
v सहभागी होणारा खेळाडू हा
दि.01/01/2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.
v खेळाडूकडे 1. आधारकार्ड 2.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी बोर्ड सर्टीफिकेट) 3. जन्मप्रमाणपत्र (5
वर्षापुर्वी काढलेले) यापैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
v सदर स्पर्धा / निवड चाचणीचे
आयोजन खेला इंडीया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्याकरीता करण्यात येत असल्याने
सहभागी खेळाडूंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
v दि.24/11/2021 रोजी सकाळी 10.00 वा. पर्यंत
आलेल्या संघांची उपस्थिती घेण्यात येईल. त्यानंतर आलेल्या संघांना प्रवेश दिला
जाणार नाही.
v निवड चाचणी दि.24/11/2021 रोजी
घेण्यात येईल. त्यासाठी दि.24/11/2021 रोजी दु.02.00 वा. पर्यंत खेळाडूंनी निवड चाचणीसाठी उपस्थिती देण्यात यावी.
स्पर्धा आयोजनाचे सर्वाधिकार आयोजन समितीला राहतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा. तसेच रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना यास्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री रविंद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment