अलिबाग (जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्य धारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या खेळाडूं भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. 64 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रीया आयोजित केली आहे.
या भरतीची सविस्तर जाहिरात व माहिती https://dopsportsrecruitment.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे असे खेळाडूं पात्र ठरणार आहेत. संबधित खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारा प्रमाणित करुन देण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील ज्या खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्याकडे अलिबाग येथे अर्ज सादर करावेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे फॉर्म 04 भरुन, स्पर्धा प्राविण्य पत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.21 नोव्हेंबर 2021 पर्यंतच अशी राहील. त्यानंतर आलेले अर्ज स्विकाराले जाणार नाही. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.--
No comments:
Post a Comment