Friday, 27 August 2021

खाजगी क्रीडा संस्था, योग केंद्रे आणि क्रीडा सुविधा यांच्यासाठी मानक प्रणाली निश्चीत

 कोविड-19 महामारीच्या प्रसारामुळे 23 मार्च 2020 पासुन आज रोजी पर्यंत संपुर्ण देशात टाळेबंदी व आवश्यक निर्बध लागु करण्यात आले आहे. हीच स्थिती राज्यातही होती. पहीली व दुसरी लाट ओसरल्यानंतर आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि.02/08/2021 च्या परिपत्रकानुसार 11 जिल्ह्यामध्ये लेवल चे निर्बंध कायम ठेवून, उर्वरीत 14 जिल्ह्यामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता आणण्यात आलेली आहे. यामध्ये व्यायामशाळा, योग-केंद्र, चालणे, धावणे, सायकलिंग या करीता मैदान, सार्वजनिक बाग यांना परवानगी  देण्यात आलेली आहे.
  कोविड-19 प्रादुर्भाव प्रसार हळु हळु कमी होत असतांना सर्व सामान्य जनतेसाठी त्याचे निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यात येत आहे. मात्र यापुढेही तिस-या लाटेची शक्यता असल्याने कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या क्रीडा, शारीरिक शिक्षण, फिटनेस व लेजर कौशल्य परिषद, नवी दिल्ली (Sports, Physical Education Fitness & Leisure Skills Council) यांनी खाजगी क्रीडा संस्था, योग केंद्रे आणि क्रीडा सुविधा यांच्यासाठी मानक प्रणाली निश्चीत केली आहे. तसेेच मा.आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य व मा. जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडून याबाबतचे निर्देश प्राप्त झाले आहेत. 
  व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक व झुंबा केंद्र तसेच खाजगी क्रीडांगणे व क्रीडा संस्था यांचे करीता मानक प्रणाली (Standard Operationg Protocol) तयार करण्यात आलेली असून ती https://irefs.in/Policies-and-guidelines/ या वेब साईटवर उपलब्ध आहे. यामध्ये मानक प्रणाली तसेच  Fitness Centre Covid Protocol Quiz उपलब्ध असून व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक केंद्र इ. करीता नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. या संस्थेमार्फत व्यायामशाळा, योग केंद्र इ. करीता कोविड-19 च्या नियमावलीचे पालन करण्यात येत असल्याचे एक शपथ पत्र तयार करण्यात येत असुन हे पत्र अधिका-यांच्या तपासणी दरम्यान शिफारस पत्र म्हणुन स्विकारले जाईल. 
  क्रीडा, शारीरिक शिक्षण, फिटनेस व लेजर कौशल्य परिषद, नवी दिल्ली (Sports, Physical Education Fitness & Leisure Skills Council) यांची मानक प्रणाली वरील नमुद वेब साईट वरुन उपलब्ध असल्याचे रायगड जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक, झुंबा प्रशिक्षण केंद्र, खाजगी क्रीडा संस्था इ. यांना कळविण्यात येत आहे. आपण आपली व्यायामशाळा, योग केंद्र, ॲरोबिक, झुंबा केंद्र, क्रीडांगणे  इत्यादींचे संचालन या मानक प्रणाली (SOP) नुसार व जिल्हा/स्थानिक प्रशासनाचे कोविड प्रतिबंधात्मक आदेशानुसार करणे बंधनकारक आहे. 
याबाबत आपणामार्फत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास dsoraigad.2009@rediffmail.com या ईमेलवर अथवा टपालाव्दारे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करण्यात यावा.

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...