केद्र शासनाच्या आयकर विभागाव्दारा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्यधारक खेळाडूंकरीता विविध पदांच्या खेळाडू भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. 22 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रीया आयेाजित केली आहे. या भरतीची सविस्तर जाहीरात व माहिती www.incometaxmumbai.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या
भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयेाजित केलेल्या शालेय
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे असे खेळाडू पात्र ठरणार आहेत. संबंधित
खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय,
महाराष्ट्र राज्य यांचेव्दारा प्रमाणित करुन देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment