Thursday 18 November 2021

खेलो इंडीया युथ गेम्स कबड्डी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा कर्नाळा स्पोर्टस ॲकेडेमी येथे होणार

                ४ थ्या खेलो इंडीया युथ गेम्स हरियाना-2022  करीता महाराष्ट्र राज्याचे संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचेवतीने जिल्हास्तरीय निवड चाचणी व स्पर्धेचे आयेाजन करण्यात येत आहे.

                कबड्डी या खेळाची स्पर्धा दि.24 ते 25 नोव्हेंबर 2021 रोजी कर्नाळा स्पोर्टस ॲकेडेमी, पनवेल येथे होणार आहे.  या स्पर्धेसाठी खालील प्रमाणे नियम व सुचना देण्यात येत आहेत.

v   या स्पर्धेसाठी वयोगट 18 वर्षाखालील मुले व मुली असा राहील, तर वजन गट 18 वर्षाखालील मुलांसाठी -70कि आणि 18 वर्षाखालील मुलींसाठी -65कि असा राहील.

v  या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील शाळा/क्लब यांचे संघ सहभाग घेऊ शकतात.

v  संघ नसलेल्या शाळेतील / क्लब मधील खेळाडू तसेच शाळाबाह्य खेळाडू निवड चाचणी मध्ये सहभाग घेऊ शकतात.

v  सहभागी होण्यासाठी सर्व संघ / खेळाडूंनी विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज दि.23/11/2021 रोजी दुपारी 12.00 वा.पर्यंत मो.क्र.8856093608 या व्हॉट्सॲप वर किंवा ईमेल raigadgames@gmail.com येथे पाठवावे.

v  सहभागी होणारा खेळाडू हा दि.01/01/2003 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा.

v  खेळाडूकडे 1. आधारकार्ड 2. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी बोर्ड सर्टीफिकेट) 3. जन्मप्रमाणपत्र (5 वर्षापुर्वी काढलेले) यापैकी किमान दोन कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.

v  सदर स्पर्धा / निवड चाचणीचे आयोजन खेला इंडीया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड करण्याकरीता करण्यात येत असल्याने सहभागी खेळाडूंना कोणत्याच स्तरावर प्रमाणपत्र दिले जाणार नाही.

v   दि.24/11/2021 रोजी सकाळी 10.00 वा. पर्यंत आलेल्या संघांची उपस्थिती घेण्यात येईल. त्यानंतर आलेल्या संघांना प्रवेश दिला जाणार नाही.

v  निवड चाचणी दि.24/11/2021 रोजी घेण्यात येईल. त्यासाठी दि.24/11/2021 रोजी दु.02.00 वा. पर्यंत खेळाडूंनी  निवड चाचणीसाठी उपस्थिती देण्यात यावी.

                स्पर्धा आयोजनाचे सर्वाधिकार आयोजन समितीला राहतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा. तसेच रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना यास्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री रविंद्र नाईक जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 

Tuesday 16 November 2021

भारतीय डाक विभागामध्ये खेळाडूंची भरती, जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून होणार शालेय क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी

अलिबाग (जिमाका):- केंद्र शासनाच्या भारतीय डाक विभागाद्वारा राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय स्तरावरील सहभागी तसेच प्राविण्य धारक खेळाडूंकरिता विविध पदांच्या खेळाडूं भरतीचा कार्यक्रम प्रसिध्द झाला आहे. 64 खेळ प्रकारातील खेळाडूंसाठी ही भरती प्रक्रीया आयोजित केली आहे. 
या भरतीची सविस्तर जाहिरात व माहिती https://dopsportsrecruitment.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भरतीसाठी ज्या खेळाडूंनी भारतीय शालेय खेळ महासंघाने आयोजित केलेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आहे असे खेळाडूं पात्र ठरणार आहेत. संबधित खेळाडूंची शालेय राष्ट्रीय स्पर्धेमधील कामगिरी, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारा प्रमाणित करुन देण्यात येत आहे.
रायगड जिल्हयातील ज्या खेळाडूंनी शालेय राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले आहे, त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांच्याकडे अलिबाग येथे अर्ज सादर करावेत जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे फॉर्म 04 भरुन, स्पर्धा प्राविण्य पत्रासह अर्ज सादर करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.21 नोव्हेंबर 2021 पर्यंतच अशी राहील. त्यानंतर आलेले अर्ज स्विकाराले जाणार नाही. याबाबत अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी श्री.सचिन निकम यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड  श्री.रविंद्र नाईक यांनी केले आहे.--

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...