Saturday 30 November 2019

“Fit India Movement” – “क्रीडा सप्ताह” दि. 12 ते 18 डिसेंबर, 2019 विविध कार्यक्रमाचे आयोजन.



                महाराष्ट्र राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना व्हावी, क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे, या दृष्टीने संदर्भांकीत शासन निर्णयान्वये दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत प्रतिवर्षी क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात येतो. तसेच समाजातल प्रत्येक नागरिकाने शारीरिक स्वास्थ्याकरिता व्यायाम करावा अथवा खेळामध्ये भाग घ्यावा प्रकृती स्वास्थ्य राखावे याकरिता केंद्र शासनामार्फत “Fit India Movement” कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
                फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ मा. पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते दि. 29 ऑगस्ट, 2019 रोजी झालेला आहे. यावेळी मा. पंतप्रधान महोदयांनी फिट इंडिया चळवळीद्वारे भारत आणि भारतीयांना 2022 पर्यंत तंदुरूस्त बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
                फिट इंडिया चळवळीचा मुख्य उद्देश हा तंदुरूस्तीचे महत्व दैनंदिन जीवनामध्ये वाढविणे हा आहे. तंदुरूस्ती हा संस्कृती परंपरेचा भाग असून तो पुढे नेण्यासाठी विविध मार्गाने सर्वत्र अभ्यासता येईल. संस्कृती, रितीरिवाज, सण, नृत्य, सामाजिक मेळावे, आहार पध्दती या मार्गाने तंदुरूस्तीचे विविध घटक आपण कालानुरूप सरावाने आत्मसात करू शकतो. पुरातन काळापासून तंदुरूस्तीला पारंपारिक खेळाचे माध्यमातून शारीरिक सुदृढतेसाठी महत्व दिलेले आहे. परंतु तंत्रज्ञानातील प्रगती आधुनिक जीवनशैली दिनक्रमामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
                देशात तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणात असून आधुनिक जीवनशैलीमुळे विविध व्याधींमुळे ग्रासले जात आहेत. फिट इंडिया चळवळीचा हेतू हा आहे की, शारीरिक सुदृढतेचे महत्व लोकांना पटवून त्याबद्दल जागृती निर्माण करणे तसेच शारीरिक सुदृढता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनविणे आहे.
                “Fit India Movement” अधिक प्रभावी राबविण्यासाठी क्रीडा सप्ताहाचे निमित्ताने शाळांमध्ये पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
.क्र.
दिनांक
उपक्रम/कार्यक्रमाचे स्वरूप
पूर्व प्राथमिक
6 वर्षांपर्यंत
प्राथमिक
(1 मे 7 वी पर्यंत)
माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालये(8 वी ते 12 वी पर्यंत)
1
12/12/2019
Free Hand Exercises
योगाभ्यास
योगाभ्यास
2
13/12/2019
मनोरंजनात्मक खेळ
पारंपारिक खेळ प्रकारांचे आयोजन (लंगडी, डॉजबॉज, लगोरी, लेझिम, संगीत खुर्ची, आंधळी कोशिंबीर, टिप-या, लिंबू चमचा, .) (स्थानिक स्तरावर अन्य खेळ निश्चित करता येतील)
पारंपारिक खेळ प्रकारांचे आयोजन (लेझिम, संगीत खुर्ची, डॉजबॉज, लगोरी, फुगडी, .) (स्थानिक स्तरावर अन्य खेळ निश्चित करता येतील)
3
14/12/2019
नृत्य
सामूहिक कवायती
एरोबिक्स, झुंबा, डंबेल्सरिंग कवायत,
सामूहिक कवायती
एरोबिक्स, झुंबा, डंबेल्सरिंग कवायत,
4
15/12/2019
क्रीडा स्पर्धा
30 मी. धावणे, रिले- 4 X 20 मी.
क्रीडा स्पर्धा आयोजन-
1) 50 मी. धावणे, 2) रिले- 4 X 50 मी. 3) कबड्डी, खो-खो, फुटबॉल, . (शाळांतर्गत क्रीडा सुविधा विचारात घेऊन खेळ आयोजित करण्यात यावेत. किमान एक सांघिक खेळ आयोजित करण्यात यावा.)
क्रीडा स्पर्धा आयोजन-
1) 100 मी. धावणे, 2) रिले- 4 X 50 मी. 3) शिक्षकांसाठी 100 मी. धावणे. 4) कबड्डी, खो-खो, फुटबॉल, व्हॉलीबॉल  . (शाळांतर्गत क्रीडा सुविधा विचारात घेऊन खेळ आयोजित करण्यात यावेत. किमान एक सांघिक खेळ आयोजित करण्यात यावा.)
5
16/12/2019
उभी राहून उंच उडी मारणे
प्रश्नमंजुषा/चित्रकला स्पर्धा विषय हे क्रीडा आरोग्य, निरोगी जीवनशैली या अनुषंगाने असावेत.
प्रश्नमंजुषा/चित्रकला स्पर्धा विष्ज्ञय हे क्रीडा आरोग्य, निरोगी जीवनशैली या अनुषंगाने असावेत.
6
17/12/2019
उभी राहून लांब उडी मारणे
खेलो इंडिया अंतर्गत शालेयस्तरावर (शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या) (Fitness Assessement in School) चे आयोजन
टीप- वयोगट चाचण्या बाबी यांची माहिती सोबत जोडली आहे.
खेलो इंडिया अंतर्गत शालेयस्तरावर (शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या) (Fitness Assessement in School) चे आयोजन
टीप- वयोगट चाचण्या बाबी यांची माहिती सोबत जोडली आहे.
7
18/12/2019
लिंबू चमचा शर्यत, बेडूक उडया
राज्य राष्ट्रीय खेळाडूंचे समवेश संवाद आहार विषयक, मानसिक आरोग्य विषयक तज्ञांचे मार्गदर्शन
राज्य राष्ट्रीय खेळाडूंचे समवेश संवाद आहार विषयक, मानसिक आरोग्य विषयक तज्ञांचे मार्गदर्शन

                शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या ह्या शाळास्तरावर घेवून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विषयक माहिती संकेतस्थळावर किंवा Mobile App द्वारे भरण्यात यावी. “Fit India Movement” अंतर्गत राबविण्यात येणा-या शाळांसाठी मानांकन/मानके तयार करण्यात आलेली आहेत. शाळांनी सदर उपक्रम प्रभावी पणे राबविण्यासाठी सक्रीय सहभाग घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
                जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेद्वारे उपरोक्त उपक्रम शाळांमध्ये राबविणेबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांचे समवेत समन्वय करून शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात येत आहे.
                क्रीडा सप्ताह दि. 12 ते 18 डिसेंबर 2019 या निमित्ताने “Fit India Movement” अधिक प्रभावी राबविण्यात येत आहे.


1 comment:

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...