Saturday, 30 November 2019

आर्मी यॉटींग नोड, कुलाबा, मुंबई यांचे वतीने "सेल इंडीया 2019" स्पर्धेचे आयोजन


            आर्मी यॉटींग नोड ची स्थापना सन 2001 मध्ये मिशन ऑलिम्पीक कार्यक्रमाचा एक भाग म्हणुन करण्यात आली होती. अल्पावधीतच यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात पदक विजेते खेळाडू निर्माण करुन राष्ट्रास सन्मान प्राप्त करुन दिला आहे.
            नौकायन स्पर्धेबाबत जागरुकता निर्माण व्हावी व ती सर्व सामन्य जनता व युवा वर्गाकरीता खुली केल्यास नौकायन खेळास / स्पर्धेस प्रोत्साहन मिळुन त्याचा प्रसार होईल व परिणामी अनेक नौकापटु निर्माण होतील. यासाठी आर्मी यॉटीं नोड यांनी Sail India 2019 ही नौकायन स्पर्धा व महोत्सव दि.01/12/2019 ते 08/12/2019 या कालावधीत गिरगावं चौपाटी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. 
            ऑलिम्पीक क्रीडा स्पर्धांमध्ये नौकायन या खेळाचा समावेश आहे. रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू /नागरिक यांनी या स्पर्धां / महोत्सवामध्ये सहभागी व्हावे तसेच या स्पर्धां प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने करण्यात येत आहे.  तसेच याबाबत अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र. 8856093608 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...