महाराष्ट्र
राज्याला 720 किमी. लांबीचा किनारा लाभलेला आहे. त्यानुषंगाने राज्यामध्ये बीच
गेम्स जसे बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच थ्रोबॉल, बीच रिंग टेनिस इत्यादी खेळांचा
प्रसार व प्रचार करण्याचे धोरण स्वीकारले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई, ठाणे इत्यादी जिल्ह्यामध्ये बीच गेम्स चे
आयोजन क्रीडा सप्ताहांतर्गत करण्यात येत आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या
वतीने रायगड जिल्ह्यामध्ये दि.12 ते 18 डिसेंबर 2019 या कालावधी क्रीडा सप्ताहाचे
आयेाजन करण्यात येत आहे. त्यांतर्गत विविध क्रीडा उपक्रमांचे आयेाजन जिल्ह्यात
करण्यात येत आहेत. त्यामध्ये बीच गेम्सचा प्रचार व प्रसार होण्यासाठी विविध बीच
गेम्स खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात
रायगड जिल्ह्यात पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.
दिनांक
|
बीच ठिकाण
|
तालुका
|
खेळ
|
14/12/2019
|
मुरुड
|
मुरुड
|
बीच लगोरी
|
14/12/2019
|
मुरुड
|
मुरुड
|
बीच रिंग टेनिस
|
14/12/2019
|
मुरुड
|
मुरुड
|
बीच वुडबॉल
|
15/12/2019
|
उरण
|
उरण
|
बीच कबड्डी
|
15/12/2019
|
उरण
|
उरण
|
बीच व्हॉलीबॉल
|
15/12/2019
|
अलिबाग
|
अलिबाग
|
बीच व्हॉलीबॉल
|
15/12/2019
|
मुरुड
|
मुरुड
|
बीच व्हॉलीबॉल
|
16/12/2019
|
वरसोली
|
अलिबाग
|
बीच थ्रोबॉल
|
17/12/2019
|
वरसोली
|
अलिबाग
|
बीच थ्रोबॉल
|
17/12/2019
|
दिवे आगार
|
श्रीवर्धन
|
बीच कबड्डी
|
17/12/2019
|
दिवे आगार
|
श्रीवर्धन
|
बीच वुडबॉल
|
वरील स्पर्धांमध्ये सहभागी
होण्यासाठी इच्छुक असलेल्या संघांनी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी याचेशी मो.क्र.
8856093608 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीम. अंकिता
मयेकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment