Monday, 5 June 2023

जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीराचे आयेाजन

        क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शारिरीक शिक्षण शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दि.26/06/2023 ते दि.05/07/2023 या कालावधीत करण्यात येत आहे. या शिबीरामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक शारिरीक शिक्षण शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल फॉर्म https://forms.gle/mqezKS8hdW1qAtFg6  मध्ये माहिती भरुन सादर करावी. त्याती पात्र /प्राधान्य क्रमानुसार शिक्षकांची निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. ज्या शिक्षकांची निवड करण्यात येईल त्यांनी प्रशिक्षणासाठी येतांना विहीत नमुन्यातील अर्जासह प्रशिक्षण ठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. सदर प्रशिक्षण शिबीर हे निवासी प्रशिक्षण शिबीर राहील.

 

आपला

रविंद्र नाईक

जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड



No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...