Friday, 30 December 2022

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन दि.01 जानेवारी रोजी

 

// बातमी प्रसिध्दीसाठी //

 

रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयेाजन दि.01 जानेवारी रोजी

 

            क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे  अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने रायगड जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.01 जानेवारी 2023 रोजी सकाळी 10.00 वा. सी के ठाकुर महाविद्यालय, खांदा कॉलनी, पनवेल येथे करण्यात येत आहे.  

            केंद्र शासनाच्या युवक कल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयेाजन करण्यात येते. त्यापुर्वी राज्यस्तरीय युवा महोत्साचे आयेाजन महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात येते. राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी रायगड जिल्ह्याचे युवक - युवतींना या युवा महोत्सवामधुन मिळणार आहे.

             या युवा महोत्सवामध्ये लोकगीत व लोकनृत्य या कला बाबींचा समावेश राहील.  लोकगीत  मध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये साथसंगतसह 10 कलाकार सहभागी होऊ शकतील, सादरीकरणासाठी त्यांना 07 मि. वेळ देण्यात येईल. लोकनृत्य मध्ये सहभागी होणाऱ्या संघामध्ये साथसंगतसह 20 कलाकार सहभागी होऊ शकतील, सादरीकरणासाठी त्यांना 15 मि. वेळ देण्यात येईल.

            सर्व युवक - युवतींचे वय 15 ते 29 वर्ष असणे गरजेचे आहे.  त्यासाठी त्यांचा जन्म दि.12 जानेवारी 1994 ते 12 जानेवारी 2008 या कालावधीत झालेला असावा.  स्पर्धा ठिकाणी संघांची प्रवेशिका भरुन सादर करावी लागेल. तसेच स्पर्धेसाठी येतांना आधार कार्ड / जन्म तारखेचा दाखला / बोर्ड प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक कादगपत्र जोडणे आवश्यक आहे.

            अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी यांचेशी मो.क्र.8856093608 येथे संपर्क साधावा व रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त संघांनी, महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...