महाराष्ट्र
राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो. जोपर्यंत ग्रामीण
भागातील नागरिकापर्यंत क्रीडा व खेळाचे महत्व पोहोचविले जाणार नाही. तेथील युवक युवतींमध्ये
क्रीडा विषयक जाणीव व वातावरण निर्माण होणार नाही. तोपर्यंत ख-या अर्थाने क्रीडा व
खेळांची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना
व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात
दरवर्षी दिनांक 29 ऑगस्ट हा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता
दिली आहे. दिनांक 29 ऑगस्ट 2019 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, रायगड-अलिबाग या कार्यालयामार्फत
कार्मेल कॉन्व्हेंट स्कुल खोपोली व न्यू इंग्लिश स्कुल मोहोपाडा या शाळांमध्ये
1. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त चर्चासत्रे/परिसंवाद
साधणे. 2. उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करणे. 3. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्यामुळे
त्यांच्या जीवनावर व्याख्यानमाला आयोजित करणे. 4. क्रीडा वातरवरण निर्मीतीसाठी अनुषंगिक
विविध उपक्रम राबविणे. या चार विषयांवर कार्यक्रम करण्यात येत असून इतरही सर्व शाळांमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यास सांगितले आहे.
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तथापि, सन 2020-2021 आणि 2021-2022 या दोन वर्ष...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...
No comments:
Post a Comment