युवा जागर- “महाराष्ट्रावर बोलू काही “ या टॅगलाईनच्या
आधारे केंद्रशासन व राज्यशासनाच्या वतिने राबविण्यात येणा-या जिल्हास्तरीय छात्र युवा
कार्यक्रमात 30 युवक/युवतींनी एकदिवसिय अभिरूप संसदेचे कामकाज अनुभवले. जिल्हा क्रीडा
अधिकारी काया्रलयाच्या वतिने पी. एन. पी कॉलेज वेश्वी, अलिबाग येथे हा उपक्रम राबविण्यात
आला. जिल्ह्यातील 197 कनिष्ठ महाविद्यालयातील युवक/युवतींनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये
भाग घेतला होता. त्यानंतर 20 कनिष्ठ महाविद्यालयांचा गट तयार करून गटस्तर स्पर्धा घेण्यात
आली. रायगड जिल्ह्यामध्ये 10 गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या गट स्पर्धेतील
प्रथम तीन क्रमांकाचे युवक/युवती जिल्हास्तर युवा संसदेच्या कार्यक्रमात सहभागी झाले.
या संसदेत सहभागी युवकांनी एकदिवसिय अभिरूप संसदेचे कामकाज केले. या संसदेचे उद्घाटन
प्राचार्य श्रीमती संजिवनी नाईक यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. यामध्ये
सहभागी युवकांनी विविध खात्याचे मंत्री, विरोधी पक्ष नेता, अध्यक्ष, सचिव इत्यादी पदाचे
कामकाज केले. संसदेच्या सुरूवातीस सर्व सदस्यांना गोपनियतेची शपथ देऊन कामकाजास सुरूवात
करण्यात आली. या संसदेमधून प्रथम क्रमांक- जहिर कुरेशी - अलिबाग, द्वितीय क्रमांक-
कृष्णाली कृष्णाकांत जोशी- पनवेल, तृतिय क्रमांक-
रमेश सुनिल कचरे- महाड यांनी प्राप्त केला. विजेत्यांना रूपये 10,000/-, 7,000/-,
5,000/- याप्रमाणे बक्षिस वितरण करण्यात आले, जिल्हास्तरीय स्पर्धेचे परिक्षण श्रीमती
जिविता पाटील, श्री. निशिकांत कोळसे व श्री.
संदीप घाडगे यांनी केले. गटस्तरावर झालेल्या विजेत्यांना रूपये 3,000/-, 2,000/-,
1,000/- याप्रमाणे रोख बक्षिस देण्यात आले. कार्यक्रमाचे पुरस्कार वितरण उपशिक्षणाधिकारी
श्री. सुनिल गवळी, जिल्हा क्रीडा अधिकारी- श्रीमती अंकिता मयेकर व गटशिक्षण अधिकारी-
श्रीमती थोरात मॅडम यांच्या हस्ते रोख रक्कम व चषक देऊन करण्यात आले. कार्यक्रमाच्या
यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...
-
फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम सहभाग नोंदवण्यासाठी वर "फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम" येथे क्लिक करा. ...
-
Primary Form Mainआज रात्री ११.३० पर्यंत भरता येईल. उद्या दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ पासून Additional Primary Form सुरू होईल, त्याची अंतिम मुदत ०७ स...

No comments:
Post a Comment