Wednesday 23 December 2020

" युवा महोत्सव- जल्लोष तरुणाईचा 2020 चे ऑनालाईन आयेाजन दि.26 डिसेंबर 2020 रोजी "

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांचे वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.26 डिसेंबर 2020 रोजी  ऑनलाईन पध्दतीने  करण्यात येत आहे.

                या युवा महोत्सवामध्ये युवांना आपल्या विविध सुप्त कला गुणांचे प्रदर्शन करण्याचे संधी यानिमित्ताने उपलब्ध होत आहे. जिल्हास्तरावर प्राविण्य मिळविणा-या युवा कलाकारांना  शासनाच्या वतीने आयोजित राज्य व राष्ट्रीय पातळीवरील युवा महोत्सावामध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे.

            या युवा महोत्सवासाठी १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक / युवती सहभाग घेऊ शकतात.

युवा महोत्सवामध्ये आयोजीत करण्यात येणा-या बाबी सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे -

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन स्पर्धात्मक पद्धतीने केले जाणार आहे

 

अ.क्र.

कलाप्रकार

कलाकार संख्या

वेळमर्यादा मिनीटांमध्ये

अ.क्र.

कलाप्रकार

कलाकार संख्या

वेळमर्यादा मिनीटांमध्ये

लोकनृत्य

२०

१५

 

 

 

शास्त्रीय वाद्य          बासरी

०१

१५

लोकगीत

०६

०७

सितार

०१

१५

एकांकीका (इंग्रजी / हिंदी)

१२

४५

तबला

०१

१०

शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी )

०१

१५

वीणा

०१

१५

शास्त्रीय नृत्य

 भरतनाट्यम, कथक, मणिपुरी, ओडिसी, कुचिपुडी

 

प्रत्येकी

 

प्रत्येकी १५

मृदुंग

०१

१०

वक्तृत्व

०१

०४

हार्मोनियम (लाईट)

०१

१०

गिटार

०१

१०

               विजेत्या स्पर्धकांना खालील प्रमाणे रोख पारितोषिक व प्रमाणपत्रे देण्यात येतील व त्यांना विभाग, राज्य  व राष्ट्रीय स्तरावील युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे.

युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी पात्रतेचे निकष खालील प्रमाणे

Ø  युवा महोत्सवाचे आयेाजन ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

Ø  दि.25 डिसेंबर 2020 रोजीपर्यंत पुर्व नोंदणी केलेल्या स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे.

Ø  पुर्व नोंदणी मोबाईल क्र.8856093608 वर व्हॉट्सॲपव्दारे  केली जाईल.

Ø  सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा.

Ø  ज्या बाबींना साथसंगत आवश्यक आहे त्या कलाकारांना वयोमर्यादा लागु नाही.

Ø  एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शकसुद्धा १५ ते २९ वयोगटातील असणे आवश्यक राहिल.

Ø  सहभागी होणारा युवा हा रायगड जिल्ह्यातील असणे आवश्यक आहे.

Ø  ओडीसी, भरतनाट्यम, मणिपुरी, कथ्थक, कुचीपुडी नृत्य सादर करणा-या कलाकारांना पुर्वमुद्रीत ध्वनीफीतीवर ( कॅसेट / सीडी ) कार्यक्रम सादर करता येईल.

Ø  लोकगीत व लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असावीत. लोकनृत्य प्रकाराकरीता टेप अथवा कॅसेटसाठी परवानगी दिली जाणार नाही.

Ø  कलाकारांनी आवश्यक असणारे साहित्य स्वत:च्या जबाबदारीवर आणावे उदा.मेक अप किट इ.

Ø  इलेक्ट्रॉनिक वाद्य स्पर्धात्मक प्रकारांमध्ये वापरण्यास परवानगी नाही.

Ø  शास्त्रीय गायनामध्ये चित्रपटातील गीतास परवानगी दिली जाणार नाही.

Ø  वक्तृत्व स्पर्धांसाठी चिठ्ठी काढून जो विषय मिळेल त्या विषयावर बोलणे आवश्यक आहे.

Ø  युवा महोत्सवातील कार्यक्रमामध्ये बदल करण्याचे अधिकार आयोजन समितीने राखून ठेवले आहेत.

Ø  कलाकाराचे वय हे दि. १२ जानेवारी, 2021 रोजीपर्यंत १५ ते २९ वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने स्पर्धेस येतांना सोबत जन्मतारखेचा दाखला / पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅन कार्ड पैकी एकाची साक्षांकित  प्रत आणणे आवश्यक आहे.

तरी सदर परिपत्रकाद्वारे जिल्ह्यातील प्रतिभावंत कलाकार, संगीत विद्यालय, महाविद्यालये, सांस्कृतिक मंडळे, नामांकीत कलाकार, संस्था यांनी महोत्सवात सहभागी व्हावे जेणे करून उत्कृष्ठ कलाकारांना विभागस्तर, राज्यस्तर राष्ट्रीय पातळीवर  चमकदार कामगिरी दाखविण्याची संधी उपलब्ध होईल.

विहीत नमुन्यातील प्रवेशिका बाबनिहाय सादर करावी.  विहीत नमुन्यातील प्रवेशिका प्राप्त करण्यासाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली संगम, पो.वेश्वी, ता. अलिबाग, जि.रायगड. संपर्क क्रमांक  श्री. सचिन निकम, क्रीडा अधिकारी 8856093608 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन श्री. संजय महाडीक, जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...