शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतिवर्षी शिवछत्रपती जीवनगौरव, पुरस्कार उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती खेळाडू/ साहसी /दिव्यांग खेळाडू पुरस्कार देण्यात येतात याबाबतची नियमावली शासन निर्णय दिनांक 24 जानेवारी 2020 अनुसार निर्गमित केलेले आहे. नियमावलीमध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. शिवछत्रपती पुरस्कार नियमावली च्या सुधारणा बाबत खेळाडू, नागरिक, संघटना, यांच्याकडून सुचना व अभिप्राय दिनांक 22 जानेवारी 2021 पर्यंत मागविण्याचे शासनाने निर्देशित केलेले आहे पुरस्काराच्या प्रस्तावित सुधारणा नियमावलीची प्रत क्रीडा विभागाच्या https:// sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पुरस्कार नियमावली च्या प्रस्तावित सुधारणांबाबत खेळाडू, नागरिक, संघटना यांनी आपल्या सूचना अभिप्राय dsysdesk14@gmail.com किंवा desk14.dsys-mh@gov.in या मेलवर दिनांक 22 जानेवारी 2021 पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड अलिबाग, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा मुंबई विभाग किंवा क्रीडा व युवक सेवा संचालनालय शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी पुणे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...
-
फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम सहभाग नोंदवण्यासाठी वर "फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम" येथे क्लिक करा. ...
-
Primary Form Mainआज रात्री ११.३० पर्यंत भरता येईल. उद्या दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ पासून Additional Primary Form सुरू होईल, त्याची अंतिम मुदत ०७ स...
No comments:
Post a Comment