वृत्तपत्र टिपणी
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे. यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदना करण्यात येणार आहेत. सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी दि. 27 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्ण्यात येतील. संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची एक प्रत स्वयंस्वाक्षांकित प्रमाणपत्रांसह अर्जदाराने संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 5 फेब्रुवारी 2020 रोजी पर्यंत सादर करावे. तसेच ऑफलाईनद्वारे अर्ज सादर करणा-या अर्जदारांनी आपला अर्ज संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयात दि. 5 फेब्रुवारी 2020 रोजी पर्यंत सादर करावे. याबाबत अधिक माहिती, पात्रतेचे निकष व नियमावली इ. माहिती साठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेतस्थळावर शासन निर्णय दिनांक 24, जानेवारी 2020 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in व www.mumbaidivsports.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जीवन गौरव पुरस्काराकरिता अर्ज मागविण्यात येत नसून अशा जेष्ठ क्रीडा महर्षीची माहिती नामांकनाद्वारे केंद्र शासनाचे पुरस्कारार्थी (महाराष्ट्रामधील) यांचेकडून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी, विभागीय उपसंचालक हे संचालनालयास सादर करतील. अधिक माहितीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संबंधित विभागाचे विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अथवा संबंधित जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पुरस्कारासाठी विहीत मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पत्ता – जिल्हा क्रीडा संकुल, नेहुली – संगम, ता. अलिबाग जि. रायगड
Friday, 31 January 2020
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2018-19 या वर्षासाठी अर्ज करण्याचे आवाहन
Subscribe to:
Post Comments (Atom)
जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे
प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...
-
प्रति, मुख्याध्यापक / प्राचार्य, क्रीडा शिक्षक, सर्व शैक्षणिक संस्था रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील शालेय क्रीडा स्पर्धांच्या ऑनलाईन प्रणा...
-
फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम सहभाग नोंदवण्यासाठी वर "फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम" येथे क्लिक करा. ...
-
Primary Form Mainआज रात्री ११.३० पर्यंत भरता येईल. उद्या दिनांक ३१ ऑगस्ट२०२३ पासून Additional Primary Form सुरू होईल, त्याची अंतिम मुदत ०७ स...
No comments:
Post a Comment