Monday 11 September 2023

जिल्हास्तरीय टेंनिकोइट व सेपक टेकरा या खेळांचे आयोजन पुढे करण्यात येत आहे.

*महत्वाची सूचना दि. 11-09-2023*

जिल्हास्तरीय टेंनिकोइट व सेपक टेकरा या खेळांचे आयोजन पुढे करण्यात येत आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित जिल्हास्तरीय टेंनिकोइट व सेपक टेकरा शालेय क्रीडा स्पर्धा यांचे नियोजित कार्यक्रमांमध्ये बदल करण्यात येत असून या कार्यक्रमात या स्पर्धांचे आयोजन लांबविण्यात येत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे दि.13 व 14 सप्टेंबर 2023 रोजीचा नियोजित कार्यक्रम रद्द समजावा. सुधारित कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर तात्काळ आपणास कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम क्रीडा अधिकारी व श्री संजय गमरे, संघटना पदाधिकारी यांना मो. +918087466574 येथे संपर्क साधावा. 
-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड

Sunday 10 September 2023

जिल्हास्तरीय शालेय वशु स्पर्धांचे आयोजन काही तांत्रिक कारणास्तव स्थगित


महत्वाची सूचना 
दिनांक 12-09-2023 रोजी नियोजित जिल्हास्तरीय शालेय वशु स्पर्धांचे आयोजन   काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात येत असून लवकरच सुधारित कार्यक्रम कळविण्यात येईल
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड

Saturday 9 September 2023

महत्त्वाची सूचना Additional Primary Form ची मुदत वाढवून देण्यात येत आहे.


Additional Primary Form ची मुदत वाढवून देण्यात येत आहे. त्याची अंतिम मुदत दि.१४ सप्टेंबर २०२३ पर्यंत राहील. सर्वांनी वेळेत फॉर्म भरण्याची दक्षता घ्यावी. तसेच दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजीची वात न पाहता दि.१३ सप्टेंबर २०२३ पर्यंतच शुल्क भरावे. म्हणजे अडचणी येणार नाहीत.
--
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड

सूचना:रायगड जिल्हास्तरीय शालेय जलतरण व वाटर पोलो स्पर्धा

रायगड जिल्हास्तरीय शालेय जलतरण व वाटर पोलो स्पर्धा दिनांक 11 सप्टेंबर 2023(सोमवार) रोजी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, जलतरण तलाव, पनवेल येथे घेण्यात येणार आहेत. सर्व गटाच्या म्हणजे 14, 17, 19 वर्ष मुले व मुली सकाळी ठीक 10.00 वाजता उपस्थित राहायचे आहे तसेच वाटर पोलो च्या संघाने दुपारी 2.00 वा. उपस्थिती द्यावी येताना ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्ज व ऑनलाइन ओळखपत्र मुख्याध्यापकाच्या सही शिक्कांनीशी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.
संपर्क: श्री दत्ता तारे 7977738571

Thursday 7 September 2023

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा क्रार्यकम

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा क्रार्यकम खालील प्रमाणे राहील
 सर्व वयोगट १४ , १७ , १९ , मुले फ़्री स्टाईल व १४ , १७ , १९ , मुली फ्री स्टाईल तसेच १७ व १९ मुले ग्रिकोरोमन  
 दिनाक 8/9/2023 रोजी सकाळी ११ वाजेपर्यत वजने होतील 
व १२ वाजता स्पर्धा सरु होतील
 स्पर्धा स्थळ : पोलीस मुख्यालय कळंबोली (पनवेल) या ठिकाणी होतील यांची सर्वानी नोंद घ्यावी
तसेच आपल्या तालुक्यातील विजयी खेळाडूना उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना द्याव्यात 
संपर्क : श्री संदिप वांजळे 9850954237
तालुक्यातून कुस्ती स्पर्धेत विजयी ठरलेले खेळाडू व व्यवस्थापक, क्रीडा शिक्षक यांनी नोंद घ्यावी.
वरील कार्यक्रमानुसार जिल्ह्यास्तरिय स्पर्धेत जाणारे खेळाडू विद्यार्थी यांच्या ओळखपत्रावर क्रीडा समन्वयक यांची सही आवश्यक आहे.

महत्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा

महत्वाची सूचना जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धा दिनांक 09 सप्टेंबर 2023 रोजी नियोजित वेळी होणार होत्या परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्यात येत आहे. संभाव्य दिनांक 16 सप्टेंबर 2023 राहतील. तथापि स्पर्धेच्या सुधारित अंतिम नियोजन लवकरच आपणास कळविण्यात येईल याची कृपया सर्व क्रीडा शिक्षक खेळाडू मुख्याध्यापक विद्यार्थी यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी श्री सचिन निकम, क्रीडा अधिकारी व श्री मुकेश गुर्दाळे स्पर्धा आयोजक मो.9699414848 यांचेशी संपर्क साधावा.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड.🙏🏻

Tuesday 5 September 2023

जिल्हास्तरीय शालेय जलतरण व वाटर पोलो स्पर्धा

 दिनांक 06सप्टेंबर 2023 रोजी होणाऱ्या रायगड जिल्हास्तरीय शालेय जलतरण व वाटर पोलो स्पर्धा या रद्द केल्या असून दिनांक 11 सप्टेंबर 2023 (सोमवार )रोजी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, जलतरण तलाव, पनवेल येथे घेण्यात येणार आहेत. सर्व गटाच्या म्हणजे 14, 17, 19 वर्ष मुले व मुली सकाळी ठीक 10.00 वाजता उपस्थित राहायचे आहे तसेच वाटर पोलो च्या संघाने दुपारी 2.00 वा. उपस्थिती द्यावी येताना ऑनलाईन भरलेला प्रवेश अर्ज व ऑनलाइन ओळखपत्र मुख्याध्यापकाच्या सही शिक्कांनीशी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

कराटे , किक बॉक्सिंग व तायक्वांदो या खेळांच्या स्पर्धा आयोजनाबाबत महत्वाची सूचना.


कराटे , किक बॉक्सिंग व तायक्वांदो या खेळांचे आयोजन शासन निर्देशानुसार स्थगित करण्यात आलेले आहे. या खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची सूचना किंवा निर्देश शासनाकडून प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्वांना या खेळांचे शुल्क भरण्याची सूचना यापूर्वीच केलेली आहे. आपण शुल्क भरावे खेळाडू प्लेयर अपलोड करण्यासाठी सद्यस्थितीमध्ये पर्याय देण्यात आलेले नाहीत. ज्यावेळी शासन या खेळांच्या स्पर्धा आयोजन करण्याचे निर्देश देईल त्यावेळी आपणास हे पर्याय उपलब्ध होतील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...