Monday 3 October 2022

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन बाबत शाळा/ महाविदयालयांना मार्गदर्श सुचना

 

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत दरवर्षी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तथापि, सन 2020-2021 आणि 2021-2022 या दोन वर्षामध्ये कोविड 19 प्रादुर्भावामुळे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नव्हते.

      सन 2022-2023 या वर्षीच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनास शासनाने नुकतीच परवानगी दिलेली आहे. यावर्षी सन 2019-20प्रमाणेच स्पर्धा आयोजनाच्या प्रवेशिका हया ऑनलाईन पधद्तीनेच घेण्यात येणार आहेत. याबाबत www.mumbaidivsports.com ही ऑनलाईन प्रवेशिका भरण्याबाबतची साईट सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. सदर साईट सुरु होताच याबाबत शाळा महाविदयालयांना अवगत करण्यात येईल. तसेच तालुकास्तरावर बैठकांचे आयेाजन करुन आपणास पुढील माहिती देण्यात येईल. तत्पुर्वी शाळा महाविदयालयांनी पुढील मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करावी. जेणेकरुन स्पर्धा आयोजन करताना अडचणी येणार नाहीत.

1)       शाळा महाविदयालयांनी आपल्यास्तरावर विविध खेळांच्या खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करुनच प्रत्येक खेळामध्ये सहभागी होणा-या वैयक्तिक व सांघिक खेळाडूंची निवड करावी.

2)       निवड झालेल्या सर्व खेळाडूंची माहिती जसे की,जन्मतारीख, इयत्ता, वय, आधारकार्ड क्रमांक, ज्या खेळामध्ये भाग घ्यावयाचा आहे त्याचे नाव इ. तयार करुन ठेवावी.

3)       कोणत्याही कारणास्तव एकदा निवड केलेला खेळाडू बदलण्याची परवानगी मिळणार नाही. त्यामुळे खेळाडूंची निवड करताना विहीत पध्दतीनेच आणि खेळाडूंना विचारुनच करण्यात यावी.

4)       सन 2022 पासुन कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी वयाचा पुरावा म्हणून स्पर्धेला जाताना खेळाडूचे आधारकार्ड / पासपोर्ट आणि जन्मतारखेचा पुरावा असणारी बाब (उदा.शाळेचे बोनाफाईड, जन्मतारखेचा दाखल्याची सत्यप्रय अथवा शाळेच्या जनरल रजिस्टरची सत्यप्रत ) असणे आवश्यक आहे.त्यामुळे याबाबत खेळाडु व पालकांना माहिती दयावी.

5)       जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडुन शालेय क्रीडा स्पर्धा आणि कार्यालयाकडुन आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबतची माहिती आपणास ही http://raigadsports.blogspot.com/  या वर उपलब्ध असेल. त्यामुळे याबाबत वरील साईट नियमित पाहण्याबाबत खेळाडू व पालकांना माहिती दयावी. स्पर्धेसाठीची प्राथमिक प्रवेशिका, खेळ निहाय प्रवेशिका, स्पर्धेच्या भाग्यपत्रिका, स्पर्धा वेळापत्रक, ठिकाण, तारखा इ. स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व माहिती ही वरील साईटवर उपलब्ध असेल, त्यामुळे सदर साईट नियमित पाहावी.

6)       प्राथमिक प्रवेशिकेची ऑनलाईन नोंद झाल्यानंतर खेळाडूंची नोंदणी (ओळखपत्र) करुन संघ / खेळाडूंचे ऑनलाईन प्रवेश अर्ज प्रत्येक स्पर्धेच्या प्रथम दिवसाच्या पाच दिवस आधी अथवा विहीत केलेल्या कालावधीमध्येच नोंद करणे आवश्यक आहे. त्यावर शाळेच्या मुख्याध्यापक अथवा महाविदयालयाच्या प्राचार्याचा सही शिक्का असणे अनिवार्य आहे. त्यांनतर सदरचा प्रवेश आपोआप बंद होईल. असा प्रकारे प्रवेश बंद झाल्यानंतर संघाची / खेळाडूची प्रवेशिका ऑनलाईन स्विकारली जाणार नाही अशा खेळाडूंना कोणत्याही सबबीवर स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही.तसेच फक्त ऑनलाईन ओळखपत्रावरही सहभागी करुन घेतले जाणार नाही. ऑनलाईन प्रवेश अर्ज आवश्यक राहील, याची सर्व क्रीडा शिक्षकांनी नोंद घेवून सहकार्य करावे, मॅन्यूअली तयार करण्यात आलेल्या प्रवेशिका / ओळखपत्रे असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

 

आपला – सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...