Wednesday 20 July 2022

*सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल महत्वाची सूचना*

दिनांक १९-०७-२०२२
*सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल महत्वाची सूचना*
फक्त रायगड जिल्हा (पनवेल मनपा वगळून)
काही तांत्रिक व अपरिहार्य कारणास्तव रायगड जिल्हा स्पर्धा २१ जुलै २०२२ रोजी होणार नाहीत. आता स्पर्धांचा सुधारित कार्यक्रम पुढीप्रमाणे देण्यात येत आहे.
*दिनांक २५ जुलै २०२२ रोजी १७ वर्षाखालील मुले*
*दिनांक २६ जुलै २०२२ रोजी १७ वर्षाखालील मुली व १४ वर्षाखालील मुले*
ठिकाण तेच राहील कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी पनवेल. संपर्क श्री समीर रेवाळे सर यांचेशी साधावा.

Thursday 14 July 2022

जिल्हास्तरीय सुब्रतो मुखजी कप फुटबॉल स्पर्धांना दि.21 जुलै रोजी सुरुवात

                 जगभरात कोरोनाचे संकट पसरल्याने जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्र कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही पडलेला दिसून आला. मागील गेल्या दोन वर्षापासुन शासकीय क्रीडा स्पर्धा झालेल्या नाहीत. विविध स्तरावरील स्पर्धा , शिबीरे, प्रशिक्षण इत्यादी कोविड कालावधीत बंद राहील्याने क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दरवर्षी रायगड जिल्ह्यातील हजारो खेळाडू विविध क्रीडा स्पर्धा व शिबीरांमध्ये सहभागी होत असतात, त्यांना याचा खरा फटका बसला आहे. 
                आता जग कोरोनाच्या सावटातून सावरत असून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्र उभारी घेत आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पनवेल महानगर पालिका यांचे वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धांचे आयोजन कर्नाळा स्पोर्टस ॲकेडेमी येथे करण्यात येत आहे. या स्पर्धांना दि.21 जुलै 2022 रोजी सुरवात होत आहे. या स्पर्धा 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व मुली या दोन वयोगटामध्ये खेळविण्यात येणार आहेत.   14 वर्षाखालील मुले (सबज्युनियर) वयोगटासाठी  जन्मतारीख – दि.01 जानेवारी 2009 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असावा तर 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनियर) वयोगटासाठी जन्मतारीख – दि.01 जानेवारी 2006 रोजी किंवा त्यांनतर जन्मलेला असणे बंधनकारक आहे. रायगड जिल्ह्यातील ज्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघांना या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घ्याचा आहे त्यांनी विहीत नमुन्यातील आपले प्रवेश अर्ज (रायगड जिल्हा करीता) raigadgames@gmail.com या ईमेलवर तर (पनवेल मनपा क्षेत्र) pmc.sports.cultural@gmail.com  या ईमेलवर सादर करण्यात यावे. स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे 1)  विहीत नमुन्यातील प्रवेश अर्ज प्राचार्य/मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी  व शिक्यासह  2)  संघातील सर्व खेळाडूंच्या जन्मदाखल्याची छायाप्रत, आधारकार्डची छायाप्रत  व बोनाफाईड प्रमाणपत्र.  सर्व संघांना प्रवेश अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 19-07-2022 असा राहील. त्यानंतर सादर होणा-या प्रवेशिकांचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
                रायगड जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांचे तांत्रिक सहकार्य या स्पर्धांसाठी घेण्यात येत आहे.  या स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी (रायगड जिल्हा संपर्क) श्री. सचिन निकम, क्रीडा अधिकारी मो.क्र.8856093608, श्री. समीर रेवाळे, कर्नाळा स्पार्टस ॲके. मो.क्र.9766235250 तर (पनवेल मनपा क्षेत्र संपर्क)  श्री.नामदेव पिचड, पनवेल मनपा, क्रीडा प्रमुख, मो.क्र.7977212962,श्रीम. मनीषा मानकर, क्रीडा मार्गदर्शक मो.क्र.9767499162,श्री. समीर रेवाळे, कर्नाळा स्पार्टस ॲके. मो.क्र.9766235250  संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रविंद्र नाईक यांनी केले आहे.   

जिल्हास्तर युवा महोत्सव सन 2023 चे आयेाजन करणे

  प्रसिध्दी पत्रक युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एका...